“…याचे परिणाम भोगावे लागतील”; छत्रपती शिवरायांबाबतच्या वक्तव्यावरुन संभाजीराजेंनी आव्हाडांना सुनावलं

कोल्हापूर : (Sambhajiraje Chhatrapati on Jitendra Awhad) राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी निशाणा साधला आहे. चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणं बरं नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संभाजीराजेंनी जितेंद्र आव्हाडांना ट्वीटमधून दिला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करुन आव्हाडांना खडे बोल सुनावले आहेत. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणं बरं नव्हे, असं खोचक सल्ला संभाजीराजेंनी जितेंद्र आव्हाडांना दिला आहे. तसेच, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही संभाजीराजे छत्रपतींनी जितेंद्र आव्हाडांना दिला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट केलंय की, “जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील.”

“हे सगळे समजायला अक्कल लागते… औरंगजेब अफजल खान हे इतिहासातून काढून टाकले तर मग शिवाजी महाराजांची लढाई कुणाबरोबर झाली. त्यांचे शौर्य चलाखी युद्ध नीति कशी समजावणार… जाऊदे तुमचा दोष नाही. हे सगळे समजणे म्हणजे मुंबईचा गँगवॉर नाही… झाकली मूठ सव्वालाखाची.”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. या ट्वीटनंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे. सोशल मीडियावरही दोन गट तयार झाले आहेत.

Prakash Harale: