“ठाकरेंची मुलाखत म्हणजे माझाच बाॅल माझीच बॅट…”, मनसेची बोचरी टीका

मुंबई | Sandeep Deshpande On Uddhav Thackeray – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. ती मुलाखत काल म्हणजेच 26 आणि 27 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली. उद्धव ठाकरेंच्या याच मुलाखतीवर अनेक नेत्यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ही मुलाखत म्हणजे माझाच बॉल माझीच बॅट, मीच अपंयार आणि मीच बॉलर अशी आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

संदीप देशपांडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलत असताना वरील टीका केली आहे. “माझीच बॅट माझाच बॉल, मीच फिल्डर मीच अंपायर अशी ती मुलाखत आहे. आम्ही मराठी माणूस आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. जेव्हा मनसेचे सहा नगरसेवक तुम्ही फोडले किंवा चोरले तेव्हाच मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवसेनेने केले. त्यामुळे मराठी माणसाबद्दल बोलायचा हक्क शिवसेनेला नाही. प्रत्येक वेळी मुंबई धोक्यात आहे, महाराष्ट्राचे तुकडे होणार आहेत या भावनिक राजकारणाचा आता फायदा होणार नाही,” अशी बोचरी टीका देशपांडे यांनी केली आहे.

तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारलं असतं, तर राज ठाकरेंनी तुम्हाला पाठिंबा दिला असता. तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला, तेव्हा तो मराठी माणसाच्या छातीत खंजीर खुपसलेला नव्हता का? शिवसेनेनं भाजपाशी युती का तोडली, का ठेवली हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. शिवसेनेने जे कटकारस्थान केलं त्याचं फळ शिवसेना आज भोगतेय,” असा टोला देखील संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

Sumitra nalawade: