“वर्षा बंगला सोडताना एखादी नवरी घर सोडते तसं…”, संदीपान भुमरेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

अमरावती | Sandipan Bhumare On Uddhav Thackeray – सध्या शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यामध्ये आता रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. वर्षा बंगला सोडताना जेव्हा एखादी नवरी घर सोडते तसं यांनी सोंग केलं असल्याची टीका भुमरेंनी केली आहे. शिंदे गटाच्या ‘हिंदू नव गर्जना यात्रा’ निमित्त अमरावतीत झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) देखील उपस्थित होते.

यावेळी संदीपान भुमरे म्हणाले, मातोश्रीवर गोचीड जमा झाले आहेत. कोणत्याच फाइलवर सही न करण्यास हे गोचीड सांगत होते. सही केली तर अडचणीत याल, असंही सांगत होते. त्यांच्यामुळे कोणाचंच काम झालं नाही, असा आरोपही त्यांनी केला.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे आणि इतर काही आमदारांनी सूरत गाठले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत देताना वर्षा बंगला सोडत असल्याचं सांगितलं होतं. शिंदे गटाने चर्चेसाठी मुंबईत यावं असं आवाहनही त्यांनी केलं होतं. या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान वर्षा बंगला सोडला. वर्षा बंगला सोडला तेव्हा एखादी नवरी घर सोडते तसं सोंग केलं असल्याचा खोचक टोला भुमरेंनी लगावला आहे.

पुढे संदीपान भुमरे म्हणाले, आम्ही उद्धव यांना भेटण्यासाठी जायचो तेव्हा ते मास्क वापरायचे, आता सरकार गेले तेव्हा मास्कही गेला आणि कोरोनाही गेला, अशी टीका देखील भुमरे यांनी केली आहे.

Sumitra nalawade: