संगमनेर (Sangamaner 4 children died by electricity current) : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातल्या येठेवादी वांदरकडा येथील ही हृदय पिलावून टाकणारी घटना घडली आहे. गावातील शाळा सुटल्यानंतर तीनच्या सुमारास शाळेतील ४ मुलं खेळण्यासाठी नजीकच्या नाल्याजवळ गेले होते. मात्र तेथे पडलेल्या तारेचा करंट लागून त्या चारही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. (sangamaner – yethewadi – wandarkada)
मुलांना करंट लागल्याने पाण्यात मृत अवस्थेत पडलेले एका आज्जीनी बघितले. त्यांनतर त्यांनी आरडाओरडा करून लोकांना गोळा केले. घटनेची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, गावकऱ्यांनी महावितरणला या घटनेला जबाबदार ठरवले आहे. ‘घटनास्थळाची पडलेली तार दुरुस्त करण्यासाठी नागरिकांनी तीन चार दिवसांपासून महावितरणकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर कोणतेही पाउल उचलण्यात आले नाही. त्यामुळेच चार चिमुकल्यांचा जीव गमावला.’ असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.