“हा संजय राऊत डाकू आहे डाकू, त्याच्यावर…”, शिंदे गटाच्या आमदाराची शिवीगाळ

मुंबई | Santosh Bangar On Sanjay Raut – सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. यावेळी कोल्हापूरात पोहोचताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं. डुप्लिकेट शिवसेनेचं (Shivsena) हे विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे राऊतांनी केलेल्या या वक्तव्यावरुन आज (1 मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी सभागृहात मोठा गदारोळ झाला.

संजय राऊतांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप (BJP) आणि शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार आक्रमक झाले आहेत. तसंच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राऊतांवर विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे. अशातच, सभागृहात मोठा गदारोळ झाल्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं आजचं कामकाज तहकूब केलं आहे.

अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज तहकूब केल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. यादरम्यान, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवीगाळ केली आहे. हा संजय राऊत डाकू आहे, त्याच्यावर 395 कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतोष बांगर यांनी केली आहे.

संतोष बांगर म्हणाले की, “आमच्या मतांवर संजय राऊत निवडून येतो आणि आम्हालाच चोर म्हणतोय. मला वाटतं, संजय राऊत हा डाकू आहे डाकू… त्याच्यावर 395 कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा”, असं म्हणत बांगर यांनी राऊतांना शिवीगाळ केली.

“आम्हाला संजय राऊत ज्या पद्धतीनं चोर म्हणत आहेत, मग उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनाही त्यांनी चोर म्हटलं आहे. महाराष्ट्रातील जनता अशा हरा**** फिरू देणार नाही,” असंही संतोष बांगर म्हणाले.

Sumitra nalawade:

View Comments (0)