‘केडी’च्या शूटींगदरम्यान जखमी झाल्याचं वृत्त संजय दत्तनं फेटाळलं; ट्विट करत म्हणाला, “हे सर्व…”

मुंबई | बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या चांगलाच चर्चेत आहे. लवकरच संजय दत्तचा ‘केडी-द डेव्हिल’ (KD The Devil) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या चित्रपटाचं शूटींग सुरू आहे. अशातच या शूटींगदरम्यान संजय दत्त जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, आता हे वृत्त फेटाळत यावर संजय दत्तनं स्पष्टीकरण दिलं आहे.

संजय दत्तनं ट्विट करत म्हटलं आहे की, “मी माझ्या जखमी होण्याचं वृत्त वाचलं. पण मी सर्वांना सांगू इच्छितो की हे वृत्त पूर्णपणे खोटं आहे. देवाच्या कृपेनं मी पूर्णपणे बरा आणि निरोगी आहे. सध्या मी केडी चित्रपटाचं शूटिंग करत असून माझी टीम सीन शूट करताना माझी अतिरिक्त खबरदारी घेत आहे. तसंच माझ्यासाठी चिंता व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार.”

दरम्यान, संजय दत्त हा त्याच्या आगामी ‘केडी द डेव्हिल’ या चित्रपटातं शूटींग करत आहे. या चित्रपटाचं शूटींग बेंगळुरूजवळ सुरू आहे. तसंच या चित्रपटात बाॅम्बस्फोटाच्या सीक्वेनस्चं शूटींग सुरू असताना स्फोट होऊन संजय दत्त गंभीर जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, हे वृत्त आता संजय दत्तनं फेटाळत त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Sumitra nalawade: