“आपल्या औकातीपेक्षा जास्त बोलू नये”, आदित्य ठाकरेंवर शिंदे गटाची खोचक टीका

बुलढाणा : (Sanjay Gaikwad On Aaditya Thackeray) मी आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडून येऊन दाखवा. तुम्ही कितीही खोके वाटले तरी इथला एकही शिवसैनिक विकला जाणार नाही, असं आव्हान शिवसेना नेते (Shivsena) आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिलं. त्यांच्या आव्हानानंतर राजकीय शिंदे गटातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

दरम्यान, यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी खोचक टीका केली आहे. आदित्य ठाकरेंचं वय ३२ वर्षे झालं आहे, त्यांचं लग्नाचं वय उलटून गेलं आहे. त्यांनी चांगली पोरगी बघून लग्न करावं. चांगला संसार करावा, विनाकारण आपल्या औकातीपेक्षा जास्त बोलू नये, असं ते म्हणाले.

पुढे गायकवाड म्हणाले, “आदित्य ठाकरेंनी आपली कुवत पाहून… ताकद पाहून… आपण कुणाला आव्हान देतोय? हे पाहावं. राज्यातील प्रश्न सोडवण्याचं, शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याचं, राज्याला सिंचन प्रकल्प देण्याचं, राज्यात उद्योगधंदे आणून बेरोजगारांना रोजगार द्यायचं, अशी आव्हानं एकनाथ शिंदेंनी स्वीकारली आहेत. ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. ते अशा कुठल्याही टीकेला कामातून उत्तर देतात.”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा त्यांच्या मतदारसंघात पराभव करणारा अजून जन्माला यायचा आहे,” असा पलटवारही बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

Prakash Harale: