बुलढाणा : (Sanjay Gaikwad On Uddhav Thackeray) शिंदे गटातील बुलढाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असतात. काल बुलढाण्यात शिवसेना-शिंदे गटातील झालेल्या राड्या प्रकरणी गायकवाड यांनी आपल्या शैलीत सेनेतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना धमकी दिली. शिंदेंच्या विरोधात बोलाल तर, चुन चुनके और गिन गिनके मारेंगे म्हणत कालचा राडा योग्यच असल्याचे त्यांनी चितावणीखोर वक्तव्य केलं आहे. यावरुन शिंदे गटातील आमदारांच्या डोक्यात सत्ता गेली आहे की काय प्रश्न उपस्थित होत आहे.
मात्र, त्यांच्या या धमकीपेक्षा संजय गायकवाड यांच्या हिंदीचीच जोरदार चर्चा राज्यभरात होताना दिसत आहे. ‘बुलढाणा जिले मे शिवसेना के लोग पातळी छोडकर बात कर रहे है. आज तो राडा बहोत कम हो गया, पोलीस ने रोक लिया. उनको पता नही है की संजय गायकवाड और उसके कार्यकर्ता कितने पागल है… ये आग्या मोहोळ की तरह डसनेवाले कार्यकर्ता है.. ये अगर खवळ जाते तो किस्के बाप को बाप समजते नही. अगर इसके बाद इन्होने कुछ भानगड करने का प्रयास किया तो चुन चुन के मारेंगे. गिन गिन के मारे जायेंगे. वो तो सौभाग्य है की पुलिस बीच मे थी…’
अशा हिंदी भाषेत काल झालेल्या राड्या प्रकरणी संजय गायकवाड यांनी आपल्या शैलीत शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे. शिंदे गटात सामिल झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या भोवतीच्या लोकांवर टीका केली होती. उद्धव ठाकरे देवमाणूस पण त्यांच्या भोवतीचे लोक त्यांना काहीच सुचू देत नव्हते. त्यामुळे शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागत होता, असा दावा संजय गायकवाड यांनी केला होता.