‘हीरामंडी’च्या फर्स्ट लूकने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Heeramandi Web Series : चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhnsali) यांची मोस्ट अवेटेड वेबसीरिज ‘हीरामंडी’चा फर्स्ट लूक (Heeramandi first look) समोर आला आहे. या वेब सिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हीरामंडीच्या फर्स्ट लूकने प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढलेल्या दिसत आहेत. महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) खास मुहूर्तावर चित्रपट निर्मात्याने त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. हीरामंडीचा फर्स्ट लूक (Heeramandi First look) चांगलाच व्हायरल होत आहे.

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), रिचा चढ्ढा(Richa Chaddha), संजीदा शेख (sanjeeda shaikh), मनीषा कोईराला (Manisha Koirala), अदिती राव हैदरी(aditi rao hydari), शर्मीन शहगल (sharmin segal) ‘हीरामंडी’मध्ये (Heeramandi) दिसणार आहेत. फर्स्ट लूक व्हिडिओमध्ये सर्व अभिनेत्रींनी गोल्डन आउटफिट घातले आहेत. सर्व अभिनेत्री आपापल्या स्टाइलमध्ये दिसत आहेत. हिरामंडी हे लाहोरमधील (Heeramandi In lahore) एका परिसराचे नाव आहे जे मुघलांच्या काळात वेश्यांसाठी ओळखले जात होते. संजय लीला भन्साळी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

यापूर्वी संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiwadi) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. गंगूबाई काठियावाडीमध्ये आलिया भट्ट (Alilya Bhatt) मुख्य भूमिकेत होती. भन्साळींनी पद्मावत, बाजीराव मस्तानी, हम दिल दे चुके सनम यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Dnyaneshwar: