“बाप हा शेवटी बापच असतो, जुना बाप किंवा…”, शिवसेना नेत्याचं कोल्हापुरात वक्तव्य

कोल्हापूर : (Sanjay Pawar On Bhagat singh Koshyari) कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे राजकारण चांगलचं तापल्याचे पहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींतून महापुरुषही सुटताना दिसत नाहीत.

दरम्यान याच पार्श्वभुमीवर त्यांचा निधेष व्यक्त करण्यासाठी कोल्हापूरात शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी पवार म्हणाले, ‘बाप हा शेवटी बापच असतो’, असं म्हणत त्यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी पवार म्हणाले, आम्ही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजंचा अपमान कदापी सहन करणार नाही. शिवराय हे अखंड भारताचे आदर्श असून आमचे दैवत आहेत. भाजपच्या काही वाचाळविर जाणीवपूर्वक वारंवार अशा प्रकारचे वक्तव्ये करुन महाराष्ट्राला अपमानीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

“भविष्यात भगतसिंह कोश्यारी किंवा सुधांशू त्रिवेदी कोल्हापुरात आले, तर कोल्हापूर बंदचं आम्ही स्वागत करू. बाप हा शेवटी बापच असतो. छोटा बाप किंवा मोठा बाप, जुना बाप किंवा नवा बाप ही आमची संकल्पना नाही. त्यांची अशी काही संकल्पना असेल तर माहिती नाही,” असं म्हणत संजय पवारांनी राज्यपाल आणि भाजपावर निशाणा साधला.

Prakash Harale: