मुंबई : (Rajya Sabha election result) राज्यसभा निवडणूक प्रक्रिया दुपारी ३ः३० वाजता पुर्ण झाली असून, २८५ आमदारांनी मतदान केले आहे. आता फक्त निकालाची प्रतिक्षा आहे. महाराष्ट्रातील सहा राज्यसभेच्या जागांपैकी पाच जागांचं चित्र स्पष्ट आहे. मात्र, सहाव्या जागेसाठी चुरस वाढलेली आहे. या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत आहे.
दरम्यान, अशी केली माविआनं मताची जुळवा-जुळव शिवसेना – 13, राष्ट्रवादी – 9, काँग्रेस – 2, बविआ – ३, बच्चू कडू (प्रहार) – 2, शंकरराव गडाख – 1, स्वाभिमानी – 1, माकप – 1, शेकाप – 1, सपा – 2 , एमआयएम – 2, अपक्षः-9 मंजुळा गावित, गीता जैन, राजेंद्र यड्राव्हकर, ,आशिष जैस्वाल ,चंद्रकांत पाटील, नरेंद्र भोंडेकर, विनोद अग्रवाल, किशोर जोरगेवार, संजय मामा शिंदे अशी सर्व मतांची गोळाबेरीज केली तर ती ४७ एवढी होती.
त्यामुळं या लढतील राज्यसभा उमेदवार संजय पवार पहिल्या पसंतीच्या मतांनं विजयी होतील असा, महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास आहे. शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे.