राज्यसभा निवडणुकीसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई | Sanjay Raut And Sanjay Pawar Filled Nomination | राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Speaks) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस नेते (Congress) आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते (Mahavikas Aghadi) उपस्थित होते. तसेच यादरम्यान शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही नेत्यांचा विजय होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. Sanjay Raut And Sanjay Pawar

राज्यातील ६ जागांसाठी राज्यातील निवडणूक होणार आहे. तसेच विविध पक्षीय बलानुसार भाजपचे दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा एक उमेदवर निवडून येऊ शकतो. तर उर्वरीत एका जागेसाठी शिवसेनेनं आपला दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. या सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) उत्सुक होते. या सहाव्या जागेसाठी मला अपक्ष म्हणून निवडून द्यावे अशी मागणी देखील त्यांनी व्यक्त केली होती. तसंच शिवसेनेनं त्यांना पक्षात प्रवेश करून उमेदवारी स्वीकारण्याची गळ घातली होती. मात्र, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेनं अखेर सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना संधी दिली आहे.

Sumitra nalawade: