“…तर तोंडाची थुंकी का उडवत होता”, दिशा सालियन प्रकरणावरून राऊतांचा राणेंवर हल्लाबोल

मुंबई | Sanjay Raut On Narayan Rane – अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha Salian) मृत्यूनं राज्यात एकच खळबळ उडाली होती. दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला होता. तसंच याप्रकरणात आदित्य ठाकरेंचं (Aditya Thackeray) नाव असल्याचा गंभीर आरोपही राणेंनी केला होता. मात्र, आता याप्रकरणात नवा खुलासा झाला आहे. दिशा सालियनचा अपघाती मृत्यू झाल्याचं सीबीआय तपासात समोर आलं आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला आहे.

“भाजपचे नेते आणि महिला नेत्यांनी आरोप केले होते त्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणेचा अहवाल समोर आला आहे, तर तोंडाची थुंकी का उडवत होता. एक तरूण नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला”, अशी टीका संजय राऊतांनी नारायण राणेंवर केली आहे.

दरम्यान, “दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरेंचा हात असल्यानंच याप्रकरणाची दाबादाबी केली. तशी लोकांची चर्चा आहे. सचिन वाझेनं हे संपूर्ण प्रकरण मॅनेज केलं”, असा आरोप नारायण राणेंनी केला होता.

Sumitra nalawade: