मुंबई (Sanjay Raut Granted Bail) : शिवसेनेचे बुलंद आवाज असलेले संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात (Patrachal) तब्बल १०२ दिवसानंतर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Sanjay Raut Granted Bail) जामीन मंजूर होताच ईडीकडून (ED) सत्र न्यायालयात जामीन तात्पुरता थांबवावा म्हणून मागणी करण्यात आली होती. मात्र, सत्र न्यायालयाने ईडीचा अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर ईडीकडून पीएमएलए कोर्टात देखील जामीन मिळू नये म्हणून धाव घेण्यात आली मात्र, तेथून देखील ईडीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे ईडी संजय राऊत यांचा पाठलाग करूनच आहे.
संजय राऊतांवर अजूनही टांगती तलवार
दरम्यान, ईडीकडून आता थेट उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. संजय राऊतांना मिळालेला जामीन थांबवा यासाठी ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीकडून याठिकाणी आपली बाजू मांडण्यात येणार आहे. त्यांची बाजू न्यायालयाला योग्य वाटल्यास अजूनही संजय राऊतांचा जामीन मागे घेतला जाऊ शकतो.