भगवा फडकावत वाघ पिंजऱ्याबाहेर! शिवसेनेत दिवाळी

मुंबई (Sanjay Raut Came Out Of Jail) : शिवसेनेची तोफ, शिवसेनेचा वाघ अशी विशेषणे ज्यांच्यासाठी वापरली जातात ते खासदार संजय राऊत हे आता आर्थर तुरुंगातून बाहेर पडले आहेत. ते बाहेर पडताच शिवसैनिकांकडून मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. फटाके वाजवत दिवाळीसारखाच जल्लोष यावेळी शिवसैनिकांनी केला आहे. संजय राऊतांना हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. (Sanjay Raut Came Out Of Jail)

संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया : ( Sanjay Raut’s First Reaction)
संजय राऊतांना माध्यमांशी संवाद साधता येत नव्हती मात्र, गाडीमध्ये बसल्यानंतर त्यांना तुमचा वाज दाबला जातोय का? असा सवाल पत्रकारांकडून करण्यात आला. त्यावर संजय राऊतानी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “न्यायालयावरचा विश्वास वाढला आहे, आम्ही सांगत होतो. सध्या माझी तब्येत ठीक नाहीये. मी माध्यमांशी सविस्तर बोलेन अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.” (Sanjay Raut’s Health)

संजय राऊतांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Dnyaneshwar: