‘संजय राऊत म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भोंगा’ : किरीट सोमय्या

मुंबई : आज खासदार संजय राऊत यांनी जागतिक व्यंगचित्र दिनाच्या शुभेच्छा देत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि शिवसेना असा राजकीय वाद चालू असताना त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आम्हांला वाटायचं की,त्यांच्यामध्ये बाळासाहेबांसारखी व्यंगचित्रकलेची क्षमता आहे परंतु राज ठाकरेंनी ते सोडून भोंग्यांचं राजकारण सुरू केलं अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. तर त्याला प्रतिउत्तर देत भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी पलटवार केला आहे.

किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हंटलं की, राऊत म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भोंगा आहे. या भोंग्यात हिम्मत असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन एफिडेविट फाईल करावी. तसंच पहाटे पाच वाजता वाजणारे भोंगे उतरवले हे या भोंग्याला कळत नाही का असा सवालही सोमय्यांनी विचारला आहे. तसंच तुम्ही आता हिरवे झाले आहात यामुळे आम्ही आता हिंदुत्वाचे रक्षण असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

तसंच मला हा महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायचा आहे. ही जबाबदारी आता माझ्यावर सोपवली असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं. याचप्रमाणे आदीत्य ठाकरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला .

Nilam: