संजय राऊत मुकणार दसरा मेळाव्याला, न्यायालयीन मुक्काम वाढला

मुंबई | Sanjay Raut – पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसंच 10 ऑक्टोबरलाच त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.

गटप्रमुखांच्या मेळाव्यात संजय राऊत अनुपस्थित असल्यानं त्यांचं नाव असलेली खुर्ची रिकामी ठेवली होती. तसंच दसरा मेळाव्याच्या आधी संजय राऊत बाहेर येतील आणि तोफ धडाडेल अशी शिवसैनिकांची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या कोठडीत वाढ झाली असल्यानं शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) संजय राऊत हजर राहू शकणार नाहीत.

दरम्यान, गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीनं 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. राऊतांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर 27 सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, कोर्टाने संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. पण आता कोर्टाने जामीन अर्जावरील सुनावणी 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

Sumitra nalawade: