नवी दिल्ली : (Sanjay Raut On Anna Hajare) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर झालेल्या कथित भूखंड घोटाळ्यामुळे राजकारण ढवळून निघलं आहे. नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहात भूखंड घोटाळा विरोधकांनी दणाणून सोडला. याच मुद्द्यावरुन शिवसेना नेते आणि खासदार यांनी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला आहे. तर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन का धारण केलं आहे, असा सवाल करत ते चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.
राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांवर झालेले आरोप गंभीर आहेत. केंद्रातील अनेक लोकांना भूखंड घोटाळ्याच्या संदर्भातील कागदपत्रे देण्यात आली आहेत. ते योग्य ठिकाणी पोहोचले असल्यानेच देवेंद्र फडणवीस शुक्रवार दि. 23 रोजी तातडीने दिल्लीत रवाना झाले आहेत. गरीबांच्या घरासाठी राखीव ठेवण्यात आलेला, 110 कोटींचा भूखंड मुख्यमंत्र्यांनी केवळ दोन कोटीत आपल्या मर्जीतील बिल्डरांना दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
दरम्यान राऊत म्हणाले, या प्रकरणी न्यायालयाने देखील सरकारवर ताशेरे ओढले आहे. मात्र मागील २४ तासात याप्रकरणी न्यायालयाचे समाधान झाले असेल. नेहमी गैरव्यवहारात बोलणारे अण्णा हजारे गप्प का, असा प्रश्न मी विचारत नसून समाजमाध्यमांवर विचारला जातो. या महाराष्ट्र सरकारने बोहणीचा ११० कोटींचा भ्रष्टाचार केला नसता तर, गरिबांना हक्काची घरे मिळाली असती. मात्र मुख्यमंत्री यावर सारवासारव करतात, ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना-शिंदे गटातील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.