“भाजपला शिवसेना फोडायचीच नाही तर संपवायची आहे”

मुंबई – महाराष्ट्राचे तीन तुकडे पाडण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेविरुद्ध शिवसेना अशी लढाई लावून रक्तपात करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष हे एकेकाळचे शिवसैनिकच होते. आम्हाला शिवसैनिकांचा रक्तपात होऊ द्यायचा नाही, आमच्या लोकांचं रक्त सांडवायचं नाही. भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही मार्ग काढू, असं राऊत म्हणाले.

दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेची याचिका न्यायालयात प्रलंबित असतानाही बहुमताचा ठराव घेतला हे बेकायदेशीर असल्याचं राऊत म्हणाले आहेत.

RashtraSanchar: