रेकॉर्ड ब्रेक शब्द कमी पडेल! उध्दव ठाकरेंच्या मालेगावातील सभेपूर्वी संजय राऊतांची गर्जना

नाशिक : (Sanjay Raut On Eknath Shinde) आज दि. 26 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता मालेगावातील एमएसजी महाविद्यालयाच्या मैदानावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे. सभेविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, मालेगावच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे नाहीतर देशाचे लक्ष लागलं आहे. मला आताच दिल्लीच्या काही नेत्यांचे फोन आले. सगळीकडे सभेची चर्चा आहे. देशात आणि महाराष्ट्रात जे सुरु आहे त्यावर उद्धव साहेब काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, स्वतः मी आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) या सभेचे काम पाहत आहोत. त्यामुळे रेकाॅर्ड ब्रेक शब्द हा कमी पडेल अशी सभा होईल. काही लोकांच्या सभेत पैसे देवून लोक आणले जातात. पैसे दिलेले लोक येतात आणि समोर प्रमुख भाषणं सुरु झाली की निघून जातात. या सभेसाठी काही संस्थानी सुट्या दिल्या आहेत, असं देखील राऊत यांनी सांगितलं.

मालेगावात उद्धव ठाकरे यांचे उर्दू भाषेतील पोस्टरवर बोलताना राऊत म्हणाले की, देशात उर्दू भाषा नाही का? त्यांनी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन केलेल्या वक्तव्याचे देखील कौतूक केलं. भाषेच्या संदर्भात चित्त विचलित करू नका, लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर या सभेमुळे काही लोकांची हात भर फाटली आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

Prakash Harale: