मुंबई : (Sanjay Raut On Eknath Shinde) भाजपने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले केले काहींना तर जेल हवा देखील खावी लागली. मात्र काही दिवसांपूर्वी त्याच नेत्यांना भाजपने मंत्रीपदीची शपथ दिली. सरकारचे नेतृत्त्व करणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांवर देखील भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामुळे आता अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची गरज आहे, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
पुढे माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, मणिपूर या विषयावर देश जागा झाला आहे. महिला कुस्तीपटुंबाबत दिल्लीत देखील घटना घडली, यात भाजपचा थेट सहभाग होता. यावर अण्णा हजारे बोलतील, अशी आम्हाला अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. असं ते म्हणाले.
“शिंदे फ्रान्समध्ये मॅक्रॉन, बायडेनलाही भेटायला जातील, त्यांच्या आयुष्यात…” ; ठाकरे गटाची टीका
Eknath Shinde: भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केलेले राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते भाजप सरकारमध्ये मंत्री झाले आहे. शिंदे गटातील नेत्यांवर देखील भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामुळे आता अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची गरज आहे, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, मणिपूर या विषयावर देश जागा झाला आहे. महिला कुस्तीपटुंबाबत दिल्लीत देखील घटना घडली,यात भाजपचा थेट सहभाग होता. यावर अण्णा हजारे बोलतील, अशी आम्हाला अपेक्षा होती.
महाराष्ट्रात ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी महाराष्ट्रात मंत्री झाले आहेत आणि मोदी त्यांचा सत्कार करतात. अण्णा हजारे यांनी आंदोलन करावे. दादा भूसे यांचा १७८ कोटींचा घोटाळा, राहुल कूल यांनी ५०० कोटी, अब्दुल सत्तार, राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रकरण मी समोर आणले आहे, असे राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांची भेटी घेतली. यावर संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यात आता काय राहीले?, काही दिवसांनी ते जो बायडेन यांना भेटायला जातील, ऋषी सूनक यांना भेटायला जातील. तसेच फ्रान्समध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन यांना देखील भेटायला जातील ते कुठेही जाऊ शकतात.
एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांची भेटी घेतली. यावर संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यात आता काय राहीले?, काही दिवसांनी ते जो बायडेन यांना भेटायला जातील, ऋषी सूनक यांना भेटायला जातील. तसेच फ्रान्समध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन यांना देखील भेटायला जातील ते कुठेही जाऊ शकतात.