“मुंडे-महाजन कुटुंबाचं नाव पुसण्याचा…”; राऊतांचा नेमका कोणावर निशाणा?

Sanjay Raut Pankaj Munde Devendra FadnavisSanjay Raut Pankaj Munde Devendra Fadnavis

मुंबई – Sanjay Raut on Pankaja Munce | भाजपने राज्यात विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांच्या 5 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या ऐकल्यानंतर मुंडे-महाजन कुटुंबाचं नाव पुसण्याचा कोणाचा तरी प्रयत्न आहे का, अशी शंका आमच्या मना निर्माण होत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे या वडिलांप्रमाणेच बहुजन समाजाच्या, ओबीसी समाजाच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांना डावलणं व्यथित करणार असल्याचं राऊत म्हणाले.

RashtraSanchar:
whatsapp
line