आमचा पक्ष फोडला, आम्ही तुम्हाला 2024 च्या निवडणुकीत फोडून काढू; राऊतांचा BJP वर हल्ला

Raut Modi 1Raut Modi 1

नागपूर : (Sanjay Raut On Narendra Modi) पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे देशभर मोदी गॅरंटी देत जात आहे. मात्र आजची सभा महाराष्ट्रात विजयाची गॅरंटी देत आहे. आजची सभा विराट सभा आहे, देशाची वाट लावणाऱ्यांसाठी ही सभा इशारा आहे. महाराष्ट्र हा झुकणार नाही. आमचे पक्ष फोडता, आम्ही तुम्हाला 2024 च्या निवडणुकीत फोडून काढू अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधारी महायुतीवर घणाघाती टीका केली. शरद पवार (Sharad Pawar) यांचे काय वय झाला आहे का? बाळासाहेब यांचे ही वय झाले नव्हते. त्यामुळे तुम्ही आमच्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रेचा आज नागपुरात समारोप झाला. या समारोपाच्या सभेत संजय राऊत संबोधित करत होते. त्यावेळी राऊत यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. पवार म्हणाले की, ही लढणाऱ्यांची आणि संघर्ष करणाऱ्यांची सभा आहे. पळपुट्यांची सभा नाही. आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणू. मध्य प्रदेशाची हवा महाराष्ट्राला लागू देणार नाही असेही राऊत यांनी म्हटले.,

ही सभा मोदींना गॅरंटी देतेय की 2024 मध्ये तुम्ही सत्तेत नसाल, 2024 मध्ये फडणवीस तुम्ही सत्तेत नसाल याची गॅरंटी देतोय. अनिल देशमुख हे जेलमधील मित्र आहेत. संघर्ष करणाऱ्यांची मैत्री पक्की आहे. आम्ही झुकलो नाही असेही राऊत यांनी सांगितले. मागील 10 वर्षांपासून देश थांबला आहे, त्यामुळे आपल्याला चालावे लागले असल्याचे राऊत यांनी म्हटले.

Prakash Harale:
whatsapp
line