“शेंदूर फासलेल्या दगडांच्या मागे…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक टोला

मुंबई | Sanjay Raut On Raj Thackeary – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला आहे. शेंदूर फासलेल्या दगडांना कुणी नमस्कार करत नाही, असा टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे. राज ठाकरे यांना एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्या दोघांबद्दल मी काय बोलणार? असं ते म्हणाले होते. तर यासंदर्भात संजय राऊतांना विचारला असता त्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

“शेंदूर फासलेल्या दगडांच्या मागे कुणीही जात नाही. काहीजण दगडांना शेंदूर फासतात आणि आता त्यांना नमस्कार करा असं सांगतात. पण लोक त्यांना नमस्कार करत नाहीत. जे स्वयंभू असतात त्या स्वयंभू नेत्यांना आणि देवतांना मान मिळतो. ठाकरे कुटुंबीय ते स्वयंभू नेते आहेत. त्यामुळे जर कुणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांनी सांगावं आमच्याकडे उपचार आहेत”, असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. तसंच त्यांनी तरूणांना संधी देत पक्षात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भात संजय राऊतांना विचारलं असता ते म्हणाले, शरद पवारांनी पक्षाबाबत जे वक्तव्य केलं आहे त्याबाबत मी बोलणार नाही. पण सध्या जे काही महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे ते पाहता महाराष्ट्रात आणि देशात भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असंही राऊत म्हणाले.

Sumitra nalawade: