सुटकेनंतर संजय राऊतांचा पहिला हल्ला राज ठाकरेंवर; म्हणाले, “शत्रूच्याबाबतही आपण…”

sanjay raut raj thackeraysanjay raut raj thackeray

मुंबई | Sanjay Raut On Raj Thackeray – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची तब्बल 103 दिवसांनंतर सुटका झाली. तरूंगातून बाहेर आल्यानंतर आज (10 नोव्हेंबर) त्यांनी पहिल्यांदाच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पहिला हल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर चढवला.

“आमचे मित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर टीका करताना संजय राऊत यांना ईडीकडून अटक होईल, त्यांनी एकांतात स्वत:शी बोलण्याची प्रॅक्टिस करावी असं म्हटलं होतं. मला त्यांना सांगायचं आहे, मला ईडीनं जी अटक केली ती बेकायदेशीर होती असं कोर्टाचं म्हणणं आहे. राजकारणामध्ये शत्रूच्याबाबतही आपण असं चिंतू नये की तो जेलमध्ये जावा. मी एकांतात होतो, जसं सावरकर होते, अटल बिहारी वाजपेयी होते. मी माझा एकांत सत्कारणी लावला”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे राऊत म्हणाले, “तीन महिन्यांनी हाताला घड्याळ बांधलं आहे. लोक मला विसरले असतील असं वाटलं, पण तसं झालं नाही. लोकांना माझी काळजी आहे, प्रेम आहे. अनेकांचे फोन आले. आज सकाळीच शरद पवारांचा फोन आला. त्यांचीही प्रकृती ठिक नाही. कोठडीतले दिवस खडतर होते. मी कायदेशीर बाबींवर जास्त भाष्य करणार नाही”.

Sumitra nalawade:
whatsapp
line