“आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, की 2024 मध्ये…”, संजय राऊतांचा शिंदे सरकारला इशारा

कोल्हापूर | Sanjay Raut On Shinde Government – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कोल्हापूरात पोहोचताच शिंदे सरकारवर (Shinde Government) हल्लाबोल केला. तपास यंत्रणांच्या माध्यमातून शिंदे सरकारनं किरीट सोमय्यांसारख्या (Kirit Somaiya) 28 चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवलाय, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते शिवगर्जना यात्रेच्या निमित्तानं कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज (1 मार्च) माध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊत म्हणाले की, “किरीट सोमय्या यांनी INS विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा केले आहेत. हे पैसे गेले कुठं याचा शेवटपर्यंत शोध लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास तपासयंत्रणांकडून सुरू होता. मात्र, सरकार बदललं आणि या चोरांना क्लिनचीट देण्यात आली. अशाप्रक्रारे तपास यंत्रणांच्या माध्यमातून या सरकारनं 28 चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला आहे”

“जे लोकं सरकार विरोधात बोलतात, त्यांना तुरुंगात टाकणं. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं, त्यांची बदनामी करणं, सध्या एवढेच उद्योग सुरू आहेत. पण आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, की 2014 मध्ये सगळ्यांचा हिशोब केला जाईल”, असा इशाराही संजय राऊतांनी शिंदे सरकारला दिला.

Sumitra nalawade: