संजय राऊतांनी केलं वसंत मोरेंचं तोंडभरुन कौतुक; राजकीय चर्चांना उधाण

पुणे | Meeting Between Sanjay Raut And Vasant More | गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले मनसे (MNS) नेते आणि पुणे महापालिकेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) आणि शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट झाली आहे. पुण्यात एका लग्नसोहळ्याच्या निमित्ताने उभय नेत्यांमध्ये भेट झाली. तसंच पहिल्याच भेटीत संजय राऊत यांनी वसंत मोरेंच्या कामाचं कौतुक केलं आहे. पाच दहा मिनटाच्या भेटानंतर ‘पुन्हा भेटू’ म्हणत दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

मागील काही दिवसांपासून वसंत मोरे मनसेत नाराज आहेत. तसंच त्यांना पुण्याच्या शहराध्यक्षपदावरुन देखील हटवण्यात आलं. मनसेच्या भोंग्यांविरोधातल्या आंदोलनात देखील त्यांचा सक्रीय सहभाग नव्हता. त्याचबरोबर राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महत्त्वकांक्षी भोंग्याविरोधी आंदोलनाला कडाडून विरोध दर्शवला होता. त्यामुळे वसंत मोरे हे सगळीकडे चर्चेत होते. दरम्यानच्या काळात त्यांना अनेक पक्षांनी अनेक ऑफर देखील दिल्या होत्या. मात्र मी मनसेत राहणार असं त्यांनी स्पष्ट केलं.

पुण्यातील एका लग्नसमारंभात संजय राऊत आणि वसंत मोरे यांची भेट झाली. या भेटीत राऊतांनी मोरेंचं तोंडभरून कौतुक केलं. ‘तुम्ही खूप भारी काम करताय’ अशी स्तुती राऊतांनी केली. यावेळी राऊतांनी वसंत मोरेंच्या पाठीवर शाबासकीची थाप देखील दिली. तसंच मोरेंनी देखील राऊतांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Sumitra nalawade: