“गट वगैरे काही नाही शिवसेना एकच आहे, बाळासाहेबांची! माझं अख्खं आयुष्य…”

मुंबई : Sanjay Raut Out Of Jail : संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर थेट त्यांच्या गाडीमध्ये बसले. त्यामुळे त्यांना माध्यमांशी व्यवस्थित संवाद साधता आला नाही. मात्र, आर्थर तुरुंगापासून (arther jail) त्यांची गाडी निघालेली असताना रस्त्यात शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केलेली आहे. त्यांना हात दाखवत ते गाडीतून पुढे पुढे जात आहेत. दरम्यान, जमेल तशी प्रतिक्रिया ते माध्यमांच्या प्रश्नांवर देत आहेत. तुरुंगाबाहेर आल्याबरोबर त्यांनी एक प्रतिक्रिया दिली होती. न्यायालयावरचा विश्वास वाढला आहे. माझी तब्येत ठीक नाहीये. मी माध्यमांशी नंतर संवाद साधणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. ( Sanjay Raut Out Of Jail)

त्यानंतर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना हात करताना त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर अगदी कमी शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “शिवसेना माझा पक्ष आहे. माझं अख्खं आयुष्य या पक्षात गेलं आहे. ज्या पक्षात जगलो त्याच पक्षात मारणार. पण पळून जाणार नाही. तुरुंगात १०० दिवस राहाणं चांगली गोष्ट नाहीये. खूप अवघड असतं तुरुंगात राहाणं. शेवटी कोर्टाने सांगितलं की मला अवैधरीत्या अटक करण्यात आली आहे. तरीपण मी एवढ्या दिवस तुरुंगात काढले.

दरम्यान, राऊतांना ठाकरे गटाच्या शिवसेनेबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी “शिवसेना एकच आहे आणि ती बाळासाहेब ठाकरेंची” अशी प्रतिक्रिया दिली.

Dnyaneshwar: