मुंबई : ( Shivsena PM Sanjay Raunt On Rebel MLA) बंडखोर एकनाथ शिंदें यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यात सुरू असलेल्या गोंधळाची आता देशभरात चर्चा झाली आहे. त्यानंतर सेनेच्या गोटातून आता स्वत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत अॅक्टिव्ह झाले आहेत. मुख्यमंत्री नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. आदित्य ठाकरे शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. तर संजय राऊत यांनीही मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. दहिसरच्या मेळाव्यात संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला.
तो एकनाथ शिंदे आख्या देशाला माहिती आहे, ठाण्यात रिक्षा चालवायचा त्याला नगरसेवक, महापौर, आमदार, मंत्री केलं पोराला खासदार केलं आणि त्यानं काय केलं शिवसेनेसोबत गद्दारी त्यांना हे शिवसैनिक कधिच माफ करणार नाहीत.
खान्देशाचा ढाण्या वाघ म्हणे, हा गुलाब पाटील काय भाषणं द्यायचा. कोल्हासारखा ढुंगणाला पाय लाऊन पळून गेला. तो पान टपरी चालवायचा. आता त्याला परत पान टपरीवर बसवणार. हे महाभारतातल्या संजयाचं वाक्य आहे. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही, असं राऊत म्हणाले.
तो संदिपान भुमरे निष्ठावंत मोरेश्वर सावेचं तिकीट कापून त्याला तिकीट दिलं. त्याला वडा सांबार खात येत नव्हता. तो हॉटेलमध्ये फरशीवर बसून खायचा. सेनेमुळे मी मंत्री झालो असं म्हणाला. मातोश्रीवर ढसाढसा रडू लागला. पण आता पाठित खंजीर खुपसला.
तो प्रकाश सुर्वे सडकी भाजी विकत होता. आता परत त्याला भाजी विकायला पाठवा. इतिहास काळापासून अनेक कटकारस्थानं झाली. या कारस्थानावर छत्रपतींपासून ते बाळासाहेबांपासून सगळ्यांनी मात केली आहे. त्यामुळे ही सेनेसाठी संधी आहे.
प्रताप सरनाईक मला भेटला. त्यांनी दिल्लीत फडणवीसांसोबत भेट झाल्याचं सांगितलं. फडणवीसांनी सरनाईकांना अमित शाहांना भेटवलं आणि सगळं मॅटर साफ झालं आहे, असं सरनाईक म्हणाले. यशवंत जाधव आणि त्यांची बायको यांनाही अमित शाहांनी साफ केलं. यांची ईडीची प्रकरणं कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये धुतली गेली. हे पहाणे खुप महत्त्वाचे ठरणार आहे.