“…असं मोदींनी जाहीर करावं”, संजय राऊतांचा पंतप्रधानांना सल्ला

श्रीनगर | Sanjay Raut – आज (19 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी ते मुंबईत येणार असून बीकेसी मैदानावर (BKC Ground) त्यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ‘शिवसेनेच्या काळात झालेल्या कामांचं उद्घाटन पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) करत आहेत’, अशी टीका शिवसेनेकडून (Shivsena) करण्यात येत आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच यावेळी त्यांनी मोदींना सल्ला देखील दिला आहे.

संजय राऊत आज काश्मीरमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत जोडो यात्रेत’ (Bharat Jodo Yatra) सहभागी होणार आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. “राहुल गांधी महाराष्ट्रात आले तेव्हा त्या यात्रेत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सहभागी झाले होते. आता शेवटच्या टप्प्यात मी जात आहे. हे अखंड भारताचं स्वप्न आहे. भारत काश्मीर ते कन्याकुमारी एक आहे आणि शिवसेनेची अखंड हिंदुस्थानावर पावलं उमटायला हवीत. त्यामुळे सुरूवातीपासूनच आम्ही या यात्रेत शेवटच्या टप्प्यापर्यंत सहभागी होतो”, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे त्यांना पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबईत विविध विकासकामांच्या उद्घाटनासोबतच अनेक घोषणाही करणार असल्याबाबत विचारला असता राऊतांनी त्यांना सीमाप्रश्नी कर्नाटकला सूचना देण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, “नरेंद्र मोदींनी बेळगावसह सीमाभागात सुरू असलेल्या अत्याचारांबाबत तिथल्या मुख्यमंत्र्यांना सूचना देऊन त्याबाबत महाराष्ट्रात घोषणा करावी. तसंच ‘यापुढे बेळगावामध्ये असलेल्या मराठी बांधवांवर अत्याचार करू नका अशा सूचना मी दिल्या आहेत’, असं मोदींनी जाहीर करावं. त्याचा आम्हाला आनंदच होईल”, असा सल्ला राऊतांनी यावेळी दिला.

“आम्ही केलेल्या कामांचं आज मोदी उद्घाटन करत आहेत. शिवसेनेची महापालिकेत सत्ता असताना अनेक प्रकल्पांची योजना, पायाभरणी आणि प्रकल्पांना सुरुवात झाली आहे”, असा दावाही राऊतांनी केला आहे.

Sumitra nalawade:

View Comments (0)