“…त्यामुळे कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्या”, संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

मुंबई | Sanjay Raut – कर्नाटक सरकारकडून जतमध्ये धरणाचं अतिरिक्त पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) सडकून टीका केली आहे. ते आज (2 डिसेंबर) नाशिक दौऱ्यावर आहेत.

संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर (Shinde Group) आणि सरकारवर निशाणा साधला. “सध्या शिंदे गटामध्ये काय सुरु आहे, कुणाचं बिनसलं आहे याची पक्की खबर आमच्याकडे आहे. त्याचा स्फोट लवकरच होईल. आता गद्दारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या बायका-पोरांनाही याचा त्रास होईल. त्यांच्या पिढ्यांना देखील ही ‘गद्दारी’ शांत जगू देणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे राऊतांनी सीमावादावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं कर्नाटकने सोडलेल्या अतिरिक्त पाण्यात जलसमाधी घेतली पाहिजे. गेल्या 50 वर्षांत महाराष्ट्रावर असं आक्रमण कधी झालं नव्हतं. बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री तुम्हाला सरळ डिवचतोय. या महाराष्ट्राला आव्हान देतोय. त्यामुळे तुमच्यात स्वाभिमान असेल तर जे पाणी त्यांनी सोडलंय त्यात जलसमाधी घ्या”, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

Sumitra nalawade:

View Comments (0)