मुंबई | Sanjay Raut – शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आजही (2 नोव्हेंबर) दिलासा मिळालेला नाही. आता त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. ईडीनं आज राऊतांच्या जामिनासंदर्भात लेखी उत्तर सादर केलं. तसंच जामिनावरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे.
कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत आणि प्रविण राऊत हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. तसंच प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी म्हणजेच 9 नोव्हेंबरला कोर्ट निर्णय देणार आहे. जामिनासंदर्भात ईडीनं आज लेखी उत्तर सादर केलं असून कोर्टानं जामिनावरील निकाल राखून ठेवला आहे.
दरम्यान, संजय राऊत हे मागील महिन्याभराहून अधिक काळापासून पत्राचाळ प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे ईडीच्या कोठडीत आहेत. सध्या संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगामध्ये कैद असून त्यांचा कोठडीतील मुक्काम 2 नोव्हेंबरपर्यंत वाढला आहे.