मुंबईत भाजपची ताकद? महापालिकेत शिवसेनेचा महापौर नसणार? शिंदे गट म्हणाला…

मुंबई : (Sanjay Shirsat On Uddhav Thackeray) मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहे. यासाठी भाजपा आणि शिवसेना ( शिंदे गट ) तयारी करण्यात येत आहे. तर, महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षही सज्ज झाला आहे. अशातच आता आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. मुंबईत भाजपपेक्षा शिवसेनेची ताकद कमी झाली आहे, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. त्यामुळं शिंदे गट स्वःताला का कमी लेखत आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शिरसाट म्हणाले, “मागीलवेळी एकनाथ शिंदे यांच्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली. भाजप आणि शिवसेनेत फक्त दोन जागांचा फरक होता. आता शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आहे. जेव्हा एखाद्या पक्षाचं विभाजन होते, तेव्हा कार्यकर्ते एका किंवा दुसऱ्या बाजूला जात नसतात. त्यांच्यात फूट पडते. एकसंघ असते, तर वेगळी गोष्ट होती,” असं संजय शिरसाट म्हणाले.

“आम्ही महापालिकेची निवडणूक ताकदीनिशी लढवणार आहोत. मात्र, आमचा प्रयत्न एवढा राहिल की शिवसेना आणि भाजपचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकला पाहिजे. त्यानंतर महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष कोण होईल, हा दुय्यम भाग आहे. पहिली सत्ता ताब्यात घेणं महत्वाचं आहे,” असं शिरसाटांनी म्हटलं.

Prakash Harale: