मुंबई | Sankarshan Karhade Shared Emotional Post – झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. तसंच ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे हे दोघे प्रमुख भूमिकेत आहेत. तर परीची भूमिका साकारणारी बालकलाकार मायरा वायकुळलाही विशेष पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातील समीर हे पात्र साकारत असलेला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने नुकताच या मालिकेतला शेवटचा भाग चित्रित केला. संकर्षण कऱ्हाडेनं या मालिकेत श्रेयस तळपदेच्या मित्राची भूमिका साकारली आहे. तसंच या दोघांच्यातील मित्राचं नातं फार सुंदररित्या दाखवलं गेलं होतं. याच संदर्भात त्याने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
संकर्षणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘बायबाय यश समीर काल आम्ही यश आणि समीर म्हणून माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतला शेवटचा सीन शूट केला मला माझ्या मित्राची, यशची… माझ्या पात्राची, समीरची आणि त्यांच्या अफलातून मैत्रीची कायम आठवण येत राहील’.
दरम्यान, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका बंद होणार असल्याचं बोललं जात आहे. यानंतर या मालिकेच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी ही मालिका बंद करु नये, अशा कमेंट्सही केल्या आहेत.