संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांचे जुळले ‘३६ गुण’, चर्चेला उधाण!

(Santosh Juvekar On Purva pawar) समाजात एखादं लग्न जुळवताना ‘३६ गुण’ पाहिले जातात.जोडप्यात काही वाद किंवा भांडण होत असेल तर त्याला आपण दोघांमध्ये ‘३६’ चा आकडा आहे म्हणतो. यालाच अनुसरुन अभिनेत्री पूर्वा पवार आणि संतोष जुवेकर यांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे.

दरम्यान, समित कक्कड दिग्दर्शित आगामी ‘३६ गुण’ या चित्रपटात संतोष जुवेकर व पूर्वा पवार हे दोघे कलाकार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. तरुण पिढीच्या दृष्टीकोनातून भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा मनोरंजक हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपल्याकडे घरदारं बघून चहा पोह्यांचा रीतसर कार्यक्रम करून, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने विवाह झालेले, सुधीर आणि क्रिया त्यांचा मधुचंद्र लंडनला करायचा ठरवतात आणि तिथे पोहचल्यावर मात्र त्यांना एकमेकांमध्ये दिसणाऱ्या गुण-अवगुणांची, आपआपसातील वेगळेपणाची जाणीव यावर ‘३६ गुण’ चित्रपट भाष्य करतो. त्यामुळे पुर्वी आणि संतोष यांच्या या भुमिकेवरुन चर्चेला उधाण आलं आहे.

Prakash Harale: