“ब्ल्यू पील्स अन् रशीयन मुलींचा वापर करून…”, सतीश कौशिक मृत्यू प्रकरणात व्यावसायिकाच्या पत्नीचा मोठा खुलासा

मुंबई | Satish Kaushik – बाॅलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सतीश यांच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. सतीश यांनी दिल्लीतील बिजवासन येथील व्यावसायिक विकास मालू (Vikas Malu) यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली. या पार्टीनंतर सतीश यांची प्रकृती बिघडली. तसंच सतीश यांची हत्या विकासनं केली असल्याचा आरोप व्यासायिकाची पत्नी सान्वी मालूनं केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

सान्वी मालू आपल्या पतीवर सातत्यानं आरोप करताना दिसत आहे. तसंच आता ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सान्वीनं विकासवर आणखी नवीन गंभीर आरोप केले आहेत. सान्वी म्हणाली की, “ऑगस्ट 2022मध्ये सतीश आणि माझे पती यांच्यामध्ये वाद झाला होता. सतीश यांनी विकासला 15 कोटी रुपये दिले होते ते त्याला परत मागत होते. भारतात आल्यानंतर मी तुमचे पैसे परत करेन असं विकासनं सतीश यांना सांगितलं होतं”.

“कोरोनामध्ये पैशाचं नुकसान झाल्यामुळे सतीश यांचे 15 कोटी परत करण्याचा विकासचा कोणताच उद्देश नव्हता. तसंच सतीश यांची हत्या करण्यासाठी मी ब्ल्यू पील्स (व्हायग्रा) आणि रशियन मुलींचा वापर करणार असल्याचंही विकासनी मला सांगितलं होतं”, असा धक्कादायक खुलासा सान्वी यांनी केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सतीश कौशिक यांच्या पत्नी शशी कौशिक यांनी हे सगळे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. तसंच या प्रकरणात पोलीस तपास व्हावा अशी शशी यांची इच्छा नाही.

Sumitra nalawade: