सरसंघचालक मोहन भागवत यांची RSS च्या दोन दिवसीय प्रांतिक बैठकीला उपस्थिती

पुणे : आज फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे घेण्यात येणाऱ्या दोन दिवसीय प्रांतिक बैठकीला सुरवात झाली . या कार्यक्रमाला आरएसएसचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव आणि पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी आदी मान्यवर उपस्थित हिते तसेच सरसंघचालक मोहन भागवत या बैठकीस पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत.

हा दोन दिवसीय कार्यक्र्म बैठकीत आरएसएच्या स्थापनेला २०२५ साली शंभर वर्षे पूर्ण होत असून त्यानिम्मित विविध कार्यक्रम, शाखा विस्तार, कार्यकर्ता गुणवत्तावाढ, कुटुंबप्रबोधन, पर्यावरण, समरसता, समाजात चांगल्या कामासाठी सज्जनशक्तीची जोडणी, संघकामातून परिवर्तन, समाजात सकारात्मक विमर्षाची मांडणी आणि समाजातील रोजगारांच्या संख्येतील वाढीच्या दृष्टीने कार्यक्रम आणि उपक्रमांवर विस्ताराने चर्चा तसेच नियोजन करण्यात आले. तसेच सुरवातीला या बैठकीत गेल्या दोन वर्ष्याच्या कोरोनच्या काळात आपलं कर्तव्य पार पडताना प्राण गमावलेल्या लष्करी जवान, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस अधिकारी तसेच सामाजिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रातील मान्यवर नागरिक व संघ कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

तसेच स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरएसएसचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर कसे संघर्षमय जीवन जगले , त्याची संघाबद्दलची कार्य किती मोठे होते आणि अनेक कार्यकर्ते घडण्यासाठी ‘संघयोगी’ हे सुरेशराव केतकर-आठवणी व लेखांचे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल .‘संघयोगी’ या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Nilam: