गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ; कोर्टानं गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या

सातारा | Gautami Patil – आपल्या नृत्यानं घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच चर्चेत असते. गौतमीचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. तिनं फक्त तिच्या नृत्यानंच नाही तर तिच्या सौंदर्यानं देखील चाहत्यांना घायाळ केलं आहे. मात्र, आता प्रसिद्ध लावणी क्विन असलेली गौतमी पाटील (Gautami Patil) अडचणीत येण्याची शक्यता आहे. सातारा कोर्टानं (Satara Court) गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटील अश्लील डान्स करते म्हणून तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. तसंच आताही गौतमी अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. प्रतिभा शेलार यांनी गौतमीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सातारा कोर्टानं तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

गौतमी पाटील (Gautami Patil) आपल्या कार्यक्रमात अश्लील हावभाव करते, लोकांना घाणारडे हातवारे करते हे असले प्रकार लोककलेत व लावणीत येतच नाहीत. महिलांचा लावणीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमीनं लावणीची संस्कृती जपावी. तिनं लावणीच करावी पण अश्लीलपणा करू नये, असं म्हणत तिच्यावर टीका करण्यात आली होती.

Sumitra nalawade: