प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड

मुंबई | Satish Kaushik Passes Away – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं निधन झालं आहे. ते 66 वर्षांचे होते. दिल्लीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तसंच सतीश कौशिक यांच्या निधनाची (Satish Kaushik Passes Away) माहिती ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.

अनुपम खेर म्हणाले की, ”मला माहिती आहे की, मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. पण मी माझा मित्र सतिश कौशिक बद्दल लिहीन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आमच्या 45 वर्षांच्या मैत्रीचा असा अचानक अंत झाला. ओम शांती!”

दरम्यान, सतिश कौशिक यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी 1983 मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ते अभिनेते तर होतेच सोबतच ते प्रसिद्ध दिग्दर्शकही होते. त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अनेक नाटकांमध्येही काम केलंय. सतीश कौशिक यांनी दीवाना मस्ताना, मिस्टर इंडिया, साजन चले ससुराल अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच त्यांनी प्रेम, हम आपके दिल में रहते है, तेरे नाम यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

Sumitra nalawade: