‘तो’ व्हिडीओ शेयर करत सयाजी शिंदेनी व्यक्त केला संताप; म्हणाले…

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते आणि आपल्या अभिनयाने घरोघरी पोहोचलेले अष्टपैलू अभिनेते म्हणून सयाजी शिंदे हे सर्वांच्याच परिचयाचे आहेत. तसंच गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः वृक्षारोपणाची जबाबदारी देखील ते पेलताना दिसत असतात. तसंच त्यांनी आज एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्हिडीओमधून त्यांनी एक धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे.

सयाजी शिंदे हे एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच ते पर्यावरणप्रेमी देखील आहेत. त्यांनी मुंबईतील घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर पालिकेच्या नव्या उड्डाणपुलावर बगळ्यांची शिकार करून चालत असणाऱ्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून या संदर्भात पोस्ट देखील केली आहे. त्यामध्ये त्यांनी शिकार करताना शिकारसुद्धा होऊ शकते असं म्हटलं आहे.

दरम्यान, सयाजी शिंदे यांनी संपूर्ण व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. यामध्ये ते काही मुलांना बगळ्याची शिकार का केली अशी विचारपूस करत आहेत. तर त्यातील काही मुलं उद्धटपणे उत्तर देताना दिसत आहेत. त्यांनी हा सर्वप्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद केला असून पोलीस प्रशासनाने लक्ष घालून कारवाई करावी असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी शेयर केलेल्या या व्हिडीओवर अनेक लोकांनी कमेंट करत त्यांना समज दिला पाहिजे अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.

Nilam: