‘आम्ही जगाची भूक भागवू शकतो’ म्हणत; गहू निर्यातवर बंदी!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल महिन्यात गव्हाचं उत्पादन विक्रमी झाल्याचं सांगतलं होतं. पुढे ते म्हणाले, आम्ही जगाची भूक भागवू शकतो. काही देशांना गव्हाची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यास भारत तयार असल्याचं मोठं विधान केलं होतं. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा निर्णय रद्द करण्यात आला असून, आज केंद्रातर्फे गव्हाच्या निर्यातीवर त्वरित बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतात गव्हाच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. परंतु, केंद्राच्या आजच्या निर्यात बंदीनंतर देशात गव्हाचे दर कमी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महागाईने त्रस्त असलेल्या सामान्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. भारतातील गहू जगातील विविध देशांमध्ये निर्याय करून शेतकऱ्यांना मोठा फायदा कमावण्याची संधी होती. यामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस बघता आले असते, परंतु, केंद्रातर्फे जाहीर कऱण्यात आलेल्या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेल्याची टीका काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

Prakash Harale: