वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपाबाबत अद्याप चर्चा सुरू आहेत. मात्र यादरम्यान आता विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून दुसरी यादीही जाहीर केली आली आहे.

विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीची सरशी पहायला मिळाली आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्या यादीत विधानसभेच्या  ११ जागांवर उमेदवार जाहीर केले होते. पहिल्या यादीत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला होता. विनय भांगे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती.

तर दुसऱ्या यादीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या दुसऱ्या उमेदवार यादीत मुस्लीम उमेदवारांना संधी दिली आहे.

वंचित बहुजन आघाडी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर वाचा

मलकापूर विधानसभा मतदार संघ क्रमांक २१ मधून शाहेजाद खान सलीम खान,
बालापूर २९ मधून खतीब सईद नतीकुद्दीन,
परभणी ९६ मधून सईद सामी सईद साहेबजान,
औरंगाबाद सेंट्रल १०७ मधून मोहम्मद जावीद मोहम्मद इश्क,
गंगापूर १११ मधून सयैद गुलाम नबी सयैद,
कल्याण पश्चिम १३८ मधून अयाझ गुलजार मौलवी,
हडपसर २१३ मधून एड.मोहम्मद अफ्रोज मुल्ला,
माण २५८ मधून इम्तियाज जफर नडाफ,
शिरोळ २८० मधून आरिफ मोहम्मद अली पटेल,
सांगली २८२ मधून आल्लाउद्दीन हयातचॉंद काजी.

Rashtra Sanchar: