जम्मू-काश्मीर : मधील कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये हजेरी लावली आहे. आज मोदींच्या हस्ते सुमारे २० हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण काश्मीरमध्ये करण्यात आले आहे. राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त नरेंद्र मोदींचा हा दौरा ठरवला होता. या प्रसंगी त्यांनी दोन केंद्रशासित प्रदेशांना जोडणाऱ्या बनिहाल-काझीगुंड रोड बोगद्याच्या उद्घाटन केले.
तसेच किश्तवाड जिल्ह्यातील ८५० मेगावॅट रॅटले जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी केली. तर ५०० किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन देखील त्यांनी केले. ज्यामुळे कार्बन न्यूट्रल बनणारी देशातील पहिली पंचायत बनली आहे. या लोकार्पण सोहळ्यात बोलताना मोदी म्हणाले, ३७० कलम काढून जम्मु-काश्मीरमध्ये लोकशाही मजबूत करण्यात आली. केंद्र सरकारच्या योजना आता येथे राबवल्या जात आहेत. त्याचा लाभ लोकांना मिळत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नवा विकास रचला जाईल. लोक आनंदाने राहात आहेत.