महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह ‘या’ १३ राज्यांच्या राज्यपालांच्या झाल्यात बदल्या; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : अनेकवेळा विरोधकांच्या विरोधानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari Resaigns) यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या जागी आता रमेश बैस (Ramesh Bais) हे नवीन राज्यपाल आलेले आहेत. आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रासहित देशातील १३ राज्यपालांच्या बदल्या केल्या आहेत. भगतसिंह कोश्यारी तसेच लडाखचे उपराज्यपाल राधाकृष्णन माथुर (Radhakrushnan Mathhur) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. तर अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत.

राष्ट्रपतींनी माजी न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर (S Abdul Nazeer) यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही नवीन राज्यपालांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

पाहा महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल रमेश बैस कोण आहेत?

देशभरात बदलण्यात आलेले राज्यपाल

  1. अरुणाचल प्रदेश: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. आतापर्यंत बीडी मिश्रा हे राज्यपाल होते, जे भारतीय लष्कराचे माजी ब्रिगेडियर होते.
  2. सिक्कीम : लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.
  3. झारखंड: सी.पी. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  4. हिमाचल प्रदेश : शिवप्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  5. आसाम : गुलाबचंद कटारिया यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  6. आंध्र प्रदेश : माजी न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.
  7. छत्तीसगड : आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  8. मणिपूर : छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  9. नागालँड : मणिपूरचे राज्यपाल एल गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  10. मेघालय : बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  11. बिहार : हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  12. महाराष्ट्र : झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.
  13. लडाख : अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बीडी मिश्रा यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Dnyaneshwar: