Anju Love Story – अंजू (Anju) ही तिच्या सोशल मीडियावरील प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेली होती. ती तिचा पती आणि मुलांना सोडून पाकिस्तानात पोहोचली आहे. तर आता अंजूनं पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानात गेल्यानंतर अंजूने तिचा प्रियकर नसरूल्लासोबत लग्न केलं आहे. तसंच तिनं इस्लाम धर्म देखील स्वीकारला आहे. त्यामुळे आता अंजू ही फातिमा बनली आहे. तिनं तिचा फेसबुक फ्रेंड नसरूल्लासोबत लग्न केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत आता पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरनं (Seema Haider) प्रतिक्रिया दिली आहे.
अंजू प्रकरणाबाबत सीमा हैदर म्हणाली की, “अंजू ही भारतात राहत होती. भारत हा असा देश आहे जिथे माणूस त्याला वाटेल ते करू शकतो. भारतात माणसाला स्वातंत्र्य आहे. पण पाकिस्तान हा असा देश आहे जिथे जर समजलं असतं की मी देश सोडला आहे तर त्यावेळी माझ्यासोबत काहीही वाईट घडलं असतं. जर माझं एका हिंदू मुलावर प्रेम आहे हे माझा नवरा हैदरला समजलं असतं तर त्यानं माझी हत्याच केली असती.”
पुढे सीमानं महिलांना भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये कशी वागणूक मिळते यातील फरक सांगितला. “महिलांना सिंध आणि बलोच या प्रांतामध्ये कसलाही आदर दिला जात नाही. चुकून जर एखाद्या महिलेची ओढणी डोक्यावरून खाली आली तर त्या महिलेला शिवीगाळ केली जाते. या प्रांतांमध्ये महिलांसाठी खूप कठोर नियम आहेत. मात्र, भारतात अशी परिस्थिती नाहीये. भारत या देशात महिलांचा खूप आदर केला जातो. जेव्हापासून मी भारतात आलीये तेव्हापासून मला खूप आदरानं वागवलं जातंय”, असंही सीमानं सांगितलं.