सीमा हैदर पुन्हा पाकिस्तानात जाणार? व्हिडीओ होतोय व्हायरल; म्हणाली, “सचिनचं प्रेम खोट…”

Seema Haider | पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सीमा हैदर सचिन मीनाच्या (Sachin Meena) प्रेमासाठी पाकिस्तानातून (Pakistan) भारतात पळून आली होती. त्यामुळे सीमा हैदर आणि सचिन मीनाची लव्हस्टोरी कायम चर्चेत असते. अशातच आता सीमाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सीमा पाकिस्तानात परत जाणार असल्याचं बोलत आहे. यावेळी तिनं सचिन आणि सचिनच्या वडीलांवर मारहाणीचे आरोप देखील केल्याचं दिसत आहे. सध्या सीमाचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

सीमा हैदरचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सीमानं म्हटलं आहे की, मी पाकिस्तानात परत जाणार आहे. मी सामान बांधलं असून परत जाण्याची तयारी केली आहे. माझ्यावर सचिन खोटं प्रेम करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तरी माझे आई-वडील आणि हैदर मला सांगत होते की सचिनला फक्त तुझे पैसे हवे आहेत.

तर सीमाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिचा पती सचिन तिला मारहाण करत असल्याचा आरोप सीमानं केला आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडीओंची तपासणी केली असता हे सर्व व्हिडीओ बनावट असल्याचं आढळून आलं आहे. सीमा हैदरच्या नावानं अनेक बनावट खाती करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे एआय टूल्सचा वापर करून फेक व्हिडीओ तयार केले जात असल्याचं म्हटलं जातंय.

Sumitra nalawade: