“मी पक्षप्रमुख असतो तर…”; लांबत चाललेल्या सुनावणीवर उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान!

मुंबई : (Senior Ad. Ujwal Nikam On Supreme Court) राज्यात चालू असलेल्या सत्तासंघर्षातील सर्वोच्च न्यायालयातील मंगळवारची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भातील पाच याचिकांचा समावेश सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती सी.टी. रवीकुमार यांच्या त्रिसदस्यीय पीठाच्या मंगळवारच्या दैनंदिन व पुरवणी कार्यसूचीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही सुनावणी आजही होणार नसल्याचं चित्र दिसत आहे.

दरम्यान, या लांबत चाललेल्या सुनावणीच्या पार्श्वभुमीवर एका वृत्तवाहिनीने कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना, तुम्ही जर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून असता तर, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे कशापद्धतीने लक्ष ठेवलं असतं? यासंदर्भात पुढची कायदेशीर कारवाई काय राहिली असती? असा प्रश्न उज्वल निकम यांना विचारण्यात आला.

या प्रश्नावर निकम म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेऊन एवढं सांगेन की मी पक्षप्रमुख असतो तर ‘देर हैं अंधेर नही’ असं म्हणालो असतो. कायद्यावर आमचा विश्वास आहे. न्याय आम्हाला मिळेल अशी खात्री ठेऊन मी माझ्या सगळ्या लोकांना विश्वास ठेवा विजय आपलाच आहे, असं सांगितलं असतं, असं उत्तर दिलं. एवढच मी त्यांना अभिवचन देऊ शकलो असतो. मनात मात्र कायम ही शंका किंवा रुखरुख राहिली असती की काय होईल उद्या. मनुष्य स्वभाव म्हणून अशी रुखरुख मनात राहू शकते, असंही निकम यांनी म्हटलं आहे.

Dnyaneshwar: