आवाजाचा बादशहा काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ वृत्तनिवेदन प्रदीप भिडेंचं निधन!

मुंबई – Pradeep Bhide passes away | दुरदर्शनवरचे सुप्रसिध्द वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक आणि आवाजाचे बादशहा प्रदीप भिडे यांचे निधन झाले आहे. प्रदीप भिडे यांची वयाच्या 65 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली आहे. याबाबत डीडी सह्याद्रीने अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली आहे.

मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात 2 ऑक्टोबर 1972 ला झाली. प्रदीप भिडे 1974 पासून ते दूरदर्शनमध्ये दाखल झाले. स्मिता पाटील, भक्ती बर्वे, ज्योत्सना किरपेकर हे सगळे त्यांचे समव्यावसायिक होते. वयाच्या 21 व्या वर्षी भिडे यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली.

बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाटय़संस्थेतून काही काळ नाटकांशी जोडले गेलेले आणि हजारो जाहिराती, माहितीपट-लघुपट यांचा ‘आवाज’ असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक प्रदीप भिडे हे दूरदर्शनमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले.

RashtraSanchar: