“खांद्यावर बंदूक ठेऊन गोळ्या चालवतात…”; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गंभीर आरोप!

मुंबई : (Deepak Kesarkar On Sanjay Raut) बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आमदारांच्यावतीने बोलताना संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. अन्य एका मुलाखतीमध्येही केसकर यांनी राऊतांवर जहरी शब्दांत टीका केली आहे. संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर खालच्या भाषेत टीका करताना आमदारांनी मुंबईत येऊन दाखवावे असे आव्हान दिले आहे. त्यानंतर गुवाहाटी येथे मुक्कामी असलेले बंडखोर आमदार देखील संतापले आहेत.

दरम्यान केसरकर म्हणाले, आम्ही आतापर्यंत शांत राहिलो होती. आम्ही ही शिवसैनिक आहोत हे राऊतांनी विसरू नये. राज्यसभेच्या निवडणूकीत संजय राऊतांना आम्हीच मतं दिली आहेत. अगोदर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि नंतर ही वक्तव्ये करावी. ही वक्तव्ये कोण सहन करणार का? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.

राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरुन शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे शिवसेना पक्ष संपव असल्याचा आरोप केला आहे. सध्या मुख्यमंत्री  विरुद्ध बंडखोर आमदार अशी न्यायलायीन लढाई सुरु असतानाच बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असणाऱ्या राऊत यांना लक्ष्य केलं आहे.

आम्ही एकाच बापाचे आहोत, जे गेले ते अनेक बापाचे आहेत, असं संजय राऊत म्हणाले होते. महाराष्ट्राने महिलांना नेहमी सन्मान दिलेला आहे. कल्याणच्या सुभेदराचा पराभव केल्यानंतर छत्रपती शिवजी महाराजांनी त्यांच्या पत्नीला आईची उपमा दिली होती. त्यात शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणाऱ्या शिवसेनेमध्ये अशा तऱ्हेचा प्रवक्ता पक्षप्रमुखांना चालतो का? अशी परखड भूमिका केसरकर यांनी घेतली. संजय राऊत हे शरद पवारांच्या आदेशानुसार शिवसेनेला संपवण्याचा काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे संजय राऊतांच्या “खांद्यावर बंदूक ठेऊन गोळ्या चालवतात” आहेत, असं केसकर यांनी म्हटलं आहे

Prakash Harale: