सात जन्म काय सात सेकंदही ‘ही’ पत्नी नको… पुरुषांनी साजरी केली ‘पिंपळपौर्णिमा’

औरंगाबाद : १४ जून रोजी सर्वत्र वटपौर्णिमा साजरी केली जात असते परंतु आज चक्क औरंगाबादमधील वाळूंज परिसरामधील पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळपोर्णिमा साजरी केली आहे. हा कार्यक्रम ‘पत्नीपीडित पुरुष आघाडी’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला १०८ फेऱ्या मारत अशी पत्नी सात जन्मच तर की सात सेकंद सुद्धा नको असं म्हंटल आहे.

पत्नीपीडित पुरुष आघाडी’ ही संस्था २०१२ ला स्थापन झाली असून २०१७ पासून ही संस्था प्रत्येकवर्षी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पुरुष पिंपळपौर्णिमा साजरी करत असते. या आश्रमात पत्नीपासून छळ होणारे अनेक पुरुष राहतात. हे सर्वजण आश्रमात एकत्र जमून पिंपळपौर्णिमा साजरी करतात. तसचं बघायला गेल तर महिलांसाठी अनेक कायदे आहेत. त्यांच्यावरील अत्याचारांना लवकर वाचा फोडत असतात. पोलीस किंवा न्यायालय त्यांना मदत करत असते. परंतु ज्या पुरुषांना पत्नीकडून वारंवार त्रास होतो, सासरवाडीच्या लोकांकडून त्रास दिला जातो, अशा पुरुषांचं कोणीच ऐकून घेत नाही, अशी खंत आश्रमातील पत्नीपीडित पुरुषांची आहे.

दरम्यान, पुरुषांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणून ही संस्था काम करत आहे. त्यातील पुरुषांनी सांगितल की, लग्न लावून दिल जात संसार म्हंटल की, वाद, भांडण होताच असतात. परंतु जेव्हा हेच भांडण कोर्ट कचेरीपर्यंत जातं त्यावेळी मात्र आम्हला कोणीच मदत करत नाहीत.अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. न आम्हला सुखानं जगू दिल जात ना आमच कोणी ऐकत असं देखील त्यांनी सांगितल आहे.पुरुषांचा मानशिक छळ कोणालाच दिसत नाही म्हणून आम्ही ही पत्नी नको म्हणून पिंपळाला फेऱ्या मारतो.

Nilam: